03. चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट (CHANDAN CHANDAN JHALI RAAT, EKVIRECHI PAAHAT HOTE VAAT)
Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

03. चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट (CHANDAN CHANDAN JHALI RAAT, EKVIRECHI PAAHAT HOTE VAAT)

P Madhav Kumar
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग …..
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग …..
लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग …..
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
📢 Follow