Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

30. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार (FIRATYA CHAKA VARATI DESI MATILA AAKAR)


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठल तू वेडा कुंभार … || धृ ||

माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळाच मग ये आकारा
तुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार … || १ ||

घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार … || २ ||

तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशी
न कळे यातून काय सांधीशी
देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार … || ३ ||
📢 Follow