01. ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसल…. (Brahma Vishnu Aani Mahesh, Samori Basale….)
Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

01. ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसल…. (Brahma Vishnu Aani Mahesh, Samori Basale….)

P Madhav Kumar
ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले
मला हे दत्त गुरु दिसले || धृ ||

माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
📢 Follow