Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

माझे माहेर पंढरी

 Majhe Maher Pandhari माझे माहेर पंढरी


माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी ॥ १ ॥


बाप आणि आई ।


माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥


पुंडलीक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू ॥३॥


माझी बहीण चंद्रभागा।


करितसे पाप भंगा ॥४॥


एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण ॥

📢 Follow