कानडा राजा पंढरीचा लिरिक्स
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा ॥
परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणु कि पुंडलिकाचा ||
हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा ||