सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ||
तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ॥