Read in: తెలుగు | ಕನ್ನಡ | தமிழ் | देवनागरी | English | മലയാളം | ગુજરાતી | मराठी |

10. माऊली च मूर्ती विठ्ठलाची (MAVULI CH MURTI VITHTHLACHI)


माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला

अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवा

कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही

ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची

माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू….. || २ ||
📢 Follow